नियम व अटी

  • Home 1
  • नियम व अटी
१) अहिल्यानगर महाकरंडक ही एकांकिका स्पर्धा हौशी नाट्यसंस्था आणि महाविद्यालये यांच्यासाठी खुली आहे.
२) ही स्पर्धा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशा स्वरुपात असून प्राथमिक फेरीला परीक्षक स्वतः तालीम स्वरूपातील एकांकिका पाहून ती अंतिम फेरी साठी निवडतील. २३ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान तालीम स्वरूपातील प्राथमिक फेरी होणार असून प्राथमिक फेरीचे नियोजन स्पर्धा संयोजकांकडून संघांना फोनद्वारे कळवण्यात येईल. तसेच ते स्पर्धेच्या संकेत स्थळावरही जाहीर करण्यात येईल.
३) अंतिम फेरी जानेवारी २०२६ मध्ये माऊली सभागृह, माऊली संकुल, झोपडी कॅन्टीन शेजारी, नगर-मनमाड रोड, अहिल्यानगर येथे होणार आहे.
४) स्पर्धेचा प्रवेश अर्ज या संकेतस्थळावर उपलब्ध असून दि. १२ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवेश अर्ज या संकेतस्थळावरच भरावयाचा आहे. (फोनवर अथवा लेखी प्रवेश स्वीकारला जाणार नाही.)
५) प्रवेश शुल्क ₹ १,१०० /- असून ते फक्त ऑनलाइनच स्वीकारले जाईल. प्रवेश शुल्काशिवाय प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही.
६) प्रत्येक संघास सहभागाचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
७) एकांकिका सादरीकरणाचा खर्च, प्रवास खर्च संघाने स्वतः करावयचा आहे. संयोजकांकडून स्पर्धकसंघाची १ दिवस राहण्याची आणि भोजनाची सोय केली जाईल.
८) तालीम स्वरूपातील प्राथमिक फेरीच्या दिवशी स्पर्धक संघाने संहितेची टाईप केलेली १ प्रत आणि लेखकाचे परवानगी पत्र, डी.आर.म. पत्र, कलाकारांची आणि तंत्रज्ञांची यादी देणे बंधनकारक आहे. संघात ८ पेक्षा जास्त तंत्रज्ञ असता कामा नये.
९) अंतिम फेरीसाठी संयोजकांकडून ८ लाईट स्पॉट,(लाईट्स बारचे डिझाईन संकेत स्थळावर उपलब्ध आहे.) ९” व १५” २ लेव्हल, २ मोडे, २ खुर्ची, २ टेबल निशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल. या व्यतिरिक्त लागणाऱ्या रंगभूषा/वेशभूषा इ. आणि अशा सर्व बाबींकरिता सवलतीच्या दरात शुल्क आकारले जाईल. परंतु त्याची माहिती प्राथमिक फेरीलाच देणे गरजेचे आहे.
१०) प्राथमिक फेरीला सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय अंतिम फेरीत प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही.
११) अंतिम फेरीसाठी प्रत्येक स्पर्धक संघास एकांकिका सादर करण्यासाठी एक तासाचा (६० मिनिटे) कालावधी देण्यात येईल. यात रंगमंच मांडणी, प्रकाश योजना, ध्वनी योजना यांसह एकांकिका सादर करून रंगमंच रिकामा करावयचा आहे. हा नियम अतिशय काटेकोरपणे पाळला जाणार असुन हा नियम न पाळणाऱ्या संघास स्पर्धेतून त्वरित बाद/डिबार करण्यात येईल.
१२) आपणास दिलेल्या तारखेस आणि वेळेलाच एकांकिका सादर करावी लागेल. आपली एकांकिका सुरु होण्याच्या २ तास आधी रिपोर्टिंग करणे गरजेचे आहे.
१३) अंतिम फेरीचे लॉट्स प्राथमिक फेरी संपल्यावर संघाना फोनद्वारे कळविण्यात येतील, तसेच ते स्पर्धेच्या संकेत स्थळावरही जाहीर करण्यात येईल.
१४) कुठल्याही संघाने कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन अथवा नियमबाह्य काम केल्यास त्याचा परिणाम निकालावर होईल, तसेच तो संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
१५) लेखनाच्या पारितोषिकासाठी सर्व लेखकांचा विचार केला जाईल, परंतु अनुवादित, भाषांतरित, रुपांतरीत अथवा आधारित संहिता असल्यास तिचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. तसेच अशा एकांकिका असणाऱ्या संघांनी मुळ लेखकाची/प्रकाशकाची/त्याच्या वारसाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याबाबतची कुठलीही जबाबदारी स्पर्धा संयोजकांकडे नसेल.
१६) स्पर्धेच्या वरील सर्व नियमात व कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवलेला असुन नियमांच्या अर्थाबाबत (Interpretation) संस्थेचा निर्णय अंतिम राहील.
१७) कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर संयोजकांनी ठरविल्यानुसार टॉप १० नाटक आपले सर्व स्वारस्य आणि कॉपीराइटसह प्रसारण आणि जाहिरातीसाठी संबंधित सर्व अधिकार आयोजकांकडे असतील.
१८) टॉप १० नाटकांचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रसारण करण्यास नकार देण्याचा प्रथम अधिकार आयोजकांना असेल.
१९) अंतिम फेरी मध्ये सादर होणाऱ्या सर्व एकांकिकांच्या स्पर्धेतील त्या प्रयोगाचे कोणत्याही दृकश्राव्य माध्यमात (Television/Ott) प्रसारण करण्याचे हक्क संयोजकांकडे असतील. तसेच त्यासाठी लागणाऱ्या लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व कलाकारांच्या योग्य त्या परवानग्या घेण्याची जबाबदारी स्पर्धक संघांची असेल.