अहमदनगर महाकरंडक २०२२

logo (1)

अहमदनगर महाकरंडक २०२२

महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा!

अहमदनगर, ५३० वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेलं शहर. याच अहमदनगर शहरात अहमदनगर महाकरंडक स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १५० हुन अधिक संघ दर्जेदार एकांकिका सादरीकरण करतात. महाकरंडकच्या व्यासपीठावरून अनेक कलाकारांना मोठी संधी प्राप्त होऊन त्यांनी आता टेलिव्हिजन, सिनेमा आणि थिएटरमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.अहमदनगर महाकरंडक या स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. गेली नऊ वर्षे अत्यंत जोशात आणि हर्षोल्हासात हि स्पर्धा संपन्न होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले रंगकर्मी प्रयोगशील आणि दर्जेदार एकांकिका येथे सादर करतात. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हि स्पर्धा होऊ शकली नाही. सर्वच रंगकर्मींना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. परंतु यावर्षी असं होणार नाही. रंगकर्मी आणि रंगभूमीची बहुप्रतीक्षित भेट यावर्षी होणार आहे. अहमदनगर महाकरंडक २०२२ – रंगभूमीची रणभूमी “उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा” हा रंगभूमीचा उत्सव येतोय नवरसांचा अविष्कार घेऊन! या नवव्या पर्वात होईल न भुतो न भविष्यती अशी स्पर्धा आणि सोबतीला असेल कलाकारांसाठी आपली कला सादर करण्याची सर्वात मोठी संधी. नवरसांनी रंगून जाईल रंगभूमीची रणभूमी. चला तर रंगकर्मींनो, तयार व्हा या रंगभूमीच्या रणसंग्रामासाठी, हि रणभूमी दणाणून सोडण्यासाठी!

आपल्या प्रतिक्षेत,

नरेंद्र फिरोदिया
संस्थापक : अहमदनगर महाकरंडक,
अध्यक्ष : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंन्डेशन

स्वप्निल मुनोत 
संयोजक : अहमदनगर महाकरंडक 

हर्षल बोरा
अध्यक्ष : श्री महावीर प्रतिष्ठान

नोंदणीची तारीख

१ डिसेंबर २०२१ ते २० डिसेंबर २०२१ (रात्री १२ वाजेपर्यंत)

स्पर्धेची तारीख

१२ जानेवारी २०२२ ते १६ जानेवारी २०२२

पारितोषिके

सांघिक पारितोषिके

एकांकिका

वैयक्तिक पारितोषिके

दिग्दर्शन

अभिनेता/ अभिनेत्री

सह-अभिनेता/अभिनेत्री:

विनोदी कलाकार :

प्रकाश योजना/संगीत/नेपथ्य:

रंगभूषा/वेशभूषा:

नियम व अटी

अहमदनगर महाकरंडक २०२०

महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा!

रंगभूमीच्या ह्या रणसंग्रामासाठी सज्ज व्हा !!