अहमदनगर महाकरंडक २०२४

logo (1)

हे आनंदक्षण पुन्हा दिसणार

अहमदनगर महाकरंडक पुन्हा होणार!

जल्लोष रंगकर्मींचा

सोहळा रंगभूमीचा!

उत्साह आणि जल्लोषाचं

हक्काचं ठिकाण!

अहमदनगर महाकरंडक २०२४

महाराष्ट्राची सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा!

साडेतीनशे पेक्षा जास्त एकांकिका, आठ केंद्र हजारो कलाकार, तितकेच तंत्रज्ञ,  चार दिवसांचा महाउत्सव, जबरदस्त आणि सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ, ही ओळख आहे  महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या एकांकिका स्पर्धेची’ अहमदनगर महाकरंडक’ रंगभूमीची रणभूमी!२०१३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अवघ्या दहा वर्षात या स्पर्धेने महाराष्ट्रातच नाही तर तर देशाच्या बाहेर सुद्धा आपला लौकिक पोहोचवला म्हणूनच, या स्पर्धेमध्ये गतवर्षी थेट अमेरिकेहून ऑनलाईन पद्धतीने एकांकिका सादर झाली. या स्पर्धेसाठी ही अत्यंत गौरवाची गोष्ट होती. पण हे सगळं घडतंय ते या स्पर्धेसाठी येणाऱ्या असंख्य कलाकारांमुळे, रसिकांमुळे, आणि अनेक मान्यवरांच्या आशीर्वादामुळे म्हणूनच अल्पावधीतच या स्पर्धेने सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचा एक मानबिंदू निर्माण केला आहे. स्पर्धा कशी असावी? तर अहमदनगर महाकरंडक सारखी असं आज प्रत्येक जण म्हणतो ते कदाचित यामुळेच. कोणतीही गोष्ट सुरू करणे यापेक्षा ती गोष्ट सातत्याने तितक्याच दर्जेदारपणे चालू ठेवणे हे अवघड असते आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही गेल्या दहा वर्षांपासून स्पर्धेच्या आयोजनाचा हा आलेख सतत उंचावतच ठेवला आहे…आलेल्या प्रत्येक कलाकाराला सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण, रात्रीचे जेवण, यासह लांबून आलेल्या कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा या स्पर्धेमध्ये केली जाते. या स्पर्धेने फक्त कलाकारांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं नाही तर त्याच कलाकारांना आपली स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची आणि आपल्या भविष्याला एक नवा आकार देण्याची संधी सुद्धा मिळवून दिली आहे. म्हणूनच आज अनेक कलाकार चित्रपट, मालिका आणि आणि इतर माध्यमांमध्ये जाऊ शकले त्यात या स्पर्धेचा खूप मोठा वाटा आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये एका नवीन सांस्कृतिक चळवळीला सुरुवात झाली आहे.

प्राथमिक फेरीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या प्रतिक्षेत,

नरेंद्र फिरोदिया
संस्थापक : अहमदनगर महाकरंडक,
अध्यक्ष : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंन्डेशन 

श्रीपाल शिंगी
अध्यक्ष : श्री महावीर प्रतिष्ठान

 

स्पर्धेची तारीख

१८ ते २१ जानेवारी  २०२४

स्पर्धेचे स्थळ

माऊली सभागृह, सावेडी, अहमदनगर

पारितोषिके

सांघिक पारितोषिके

एकांकिका

वैयक्तिक पारितोषिके

दिग्दर्शन

अभिनेता/ अभिनेत्री

सह-अभिनेता/अभिनेत्री:

विनोदी कलाकार :

प्रकाश योजना/संगीत/नेपथ्य:

रंगभूषा/वेशभूषा:

नियम व अटी

अहमदनगर महाकरंडक २०२३ ची काही क्षणचित्रे

महाराष्ट्राची सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा!

अहमदनगर महाकरंडक २०२४ साठी उरले अवघे...

  • 00दिवस
  • 00तास
  • 00मिनिटे
  • 00सेकंद

रंगभूमीच्या ह्या रणसंग्रामासाठी सज्ज व्हा !!