प्राथमिक फेरी
 

अहमदनगर महाकरंडक २०१९

अहमदनगर, ५२८ वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेलं शहर.
आजपर्यंत या शहराने रंगभूमीला असे कलाकार दिले, ज्यांनी मराठी रंगभूमी नुसती गाजवलीच नाही तर ती समृद्ध केली. हाच समृध्द वारसा घेवून आम्ही अहमदनगरच्या कलाप्रवाहत कलाकारांच्या जाणीवा आणि सादरीकरण यांचा दृष्टीकोन व्यापक करण्यासाठी त्यांना देवू केलंय एक भव्य व्यासपीठ “अहमदनगर महाकरंडक “ - रंगभूमीची रणभूमी २०१९ आम्ही आहोत फक्त एक माध्यम, मात्र रंगभूमीची हि रणभूमी रंगणार आहे. आपण उधळणाऱ्या हजारो कलारूपी रंगानी...चला तर मग सज्ज व्हा हि रणभूमी दणाणून सोडण्यासाठी... आपल्या प्रतिक्षेत,
नरेंद्र फिरोदिया (ट्रस्टी : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशन)
स्वप्निल मुनोत ( संयोजक : अहमदनगर महाकरंडक )
हर्षल बोरा (अध्यक्ष : श्री महावीर प्रतिष्ठान)

आनंदी उत्सवाची ७ वर्षे

कित्येक महिन्यांची तयारी, स्पर्धेची अधिकृत घोषणा, मैलोनमैल अंतर ओलांडून केलेला प्रवास, रंगमंचावर पहिले पाऊल ठेवण्याची उत्सुकता, सादरीकरणाची आतुरता, स्पर्धेची चुरस, ओसंडून वाहणारा उत्साह, रसिकांची मिळालेली अनपेक्षित दाद आणि विजेतेपदाचा जल्लोष यासर्वात अधीरेखित होणारा असतो तो आनंदी उत्सव. जो आनंदी उत्सव कित्येक हरहुन्नरी कलाकारांना आणि लेखकांना व्यक्त होण्याचे हक्काचे जणू व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो. म्हणूनच संयोजकाच्या भूमिकेतून आम्ही पुन्हा एकदा 'अहमदनगर महाकरंडक' या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून, आनंदी सोहळ्यात सहभागी होऊन आनंदी क्षणांची लयलूट करण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहोत..!

मनोगत

ऐतिहासिक अहमदनगर शहराला कलासक्त पारंपरिक वारसा लाभलेला आहे. ज्याच्या खाणाखुणा आजही शहरातील फराह बख्श महालासारख्या विविध पुरातन वास्तूंच्या स्वरूपात आपल्या कलाप्रेमाची ग्वाही देत उभ्या असलेल्या पहायला मिळतात. म्हणूनच महाराष्ट्रातीलचं नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील युवा कलाकारांना व लेखकांना प्रोत्साहित करून त्यांना व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ध्येय मनाशी बाळगूनच, २०१३ साली अहमदनगर महाकरंडक या सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्याचा निश्चय महावीर प्रतिष्ठान व अनुष्का मोशन फिल्म्सच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता.
ज्या स्पर्धेची गेल्या ७ वर्षाची यशस्वी वाटचाल हि आयोजकांनादेखील दरवेळी नवा उत्साह बहाल करणारी ठरली आहेत. त्यामुळेच तर या वर्षीचे स्पर्धेचे हे ७ वे वर्ष या एकंदर वाटचालीच्या एका वळणावर मागे वळून पहाताना जणू आनंदी उत्सवाच्या ७ वर्षांवर शिक्कामोर्तब करणारे ठरणार आहे. शिवाय यादरम्यान स्पर्धेत आपल्या अभिनयाचा, लेखनाचा व एकांकिका सादरीकरणाच्या इतर विभागात वेगळा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांना सन्मानित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पारितोषिच्या एकूण रकमेत; करण्यात आलेली ३ लाख रुपये रकमेची उत्तरोत्तर वाढ, तसेच यावर्षीपासून प्रथमच या व्यासपीठावर सादर होणाऱ्या एकांकिकेला प्रोत्साहित करण्यासाठी दिले जाणारे ११,००० रुपयांचे पारितोषिक हे "अहमदनगर महाकरंडक" स्पर्धेचा उंचावलेला दर्जा व भव्य स्वरूप अधोरेखित करणारे ठरत आहे. म्हणूनच प्रायोजक या भूमिकेतून मी देखील अधिकाधिक संघांना या स्पर्धेत सहभागी होऊन, स्वतःत दडलेल्या सूक्त कला गुणांचे सादरीकरण करण्याचे आवाहन करतो. ज्या माध्यमातून फक्त स्पर्धाच नव्हे तर सर्व कलाप्रेमी श्रोत्यांची मने जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल असा आम्हालादेखील विश्वास आहे.

पारितोषिके

सांघिक पारितोषिके

एकांकिका: प्रथम क्रमांक: ७१,१११/- रुपये रोख, अहमदनगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ५१,१११/- रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: ३१,१११/- रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र
चतुर्थ क्रमांक: २१,१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ: ५,१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका: ११,१११/- रुपये रोख, करंडक आणि प्रमाणपत्र

वैयक्तिक पारितोषिके

दिग्दर्शन
प्रथम क्रमांक: २१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ : ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ : ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

अभिनेता/ अभिनेत्री
प्रथम क्रमांक: ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ : ३११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ : ३११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

सह-अभिनेता/अभिनेत्री:
प्रथम क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

विनोदी कलाकार :
प्रथम क्रमांक: ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

प्रकाश योजना/संगीत/नेपथ्य:
प्रथम क्रमांक: ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

रंगभूषा/वेशभूषा:
प्रथम क्रमांक: ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

लेखन:
प्रथम क्रमांक: ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

प्रथमतः सादरीकरण:
उत्तेजनार्थ १११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

30 +

Cash Prize

Worth More than

3 Lakh

नियम व अटी


१) अहमदनगर महाकरंडक हि एकांकिका स्पर्धा फक्त मराठी एकांकिकासाठी मर्यादित असुन महाराष्ट्रातील हौशी नाट्यसंस्था आणि महाविद्यालये यांच्यासाठीच खुली आहे.
२) हि स्पर्धा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशा स्वरुपात आयोजित केलेली असुन, प्राथमिक फेरीला परीक्षक स्वतः तालीम स्वरूपातील एकांकिका पाहून तिची अंतिम फेरीसाठी निवड करतील. २६ डिसेंबर २०१८ ते १० जानेवारी २०१९ दरम्यान तालीम स्वरूपातील प्राथमिक फेरी होणार असुन अंतिम फेरीसाठी संघ त्याच दिवशी निवडले जातील. प्राथमिक फेरीचे नियोजन स्पर्धा संयोजकांकडून संघाना फोनद्वारे कळवण्यात येईल. तसेच ते स्पर्धेच्या संकेत स्थळावरही जाहीर करण्यात येईल.
३) अंतिम फेरी १७ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान सकाळी १० वाजता माऊली सभागृह, माऊली संकुल, झोपडी कॅन्टीन शेजारी, नगर-मनमाड रोड, अ.नगर येथे होणार असुन. त्याचा बक्षीस समारंभ २० जानेवारीलाच पार पडेल.
४)स्पर्धेचा प्रवेश अर्ज याच संकेतस्थळावर उपलब्ध असून दि. ०३ डिसेंबर २०१८ ते दि. २४ डिसेंबर २०१८ या कालावधीत प्रवेश अर्ज या संकेतस्थळावरच भरावयाचा आहे. (फोनवर अथवा लेखी प्रवेश स्वीकारला जाणार नाही.)
५) प्रवेश शुल्क ११०० /- असून ते फक्त ऑनलाइनच स्वीकारले जाईल. प्रवेश शुल्काशिवाय कुठल्याही संघाचा प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही.
६)एकूण २५ एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या जातील.
७) प्रत्येक संघास सहभागाचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
८) एकांकिका सादरीकरणाचा खर्च, प्रवास खर्च संघाने स्वतः करावयचा आहे. संयोजकांकडून स्पर्धक संघाची १ दिवस राहायची आणि भोजनाची सोय केली जाईल.
९) तालीम स्वरूपातील प्राथमिक फेरीच्या दिवशी स्पर्धक संघाने संहितेच्या टाईप केलेल्या ४ प्रती आणि त्या सोबतच लाईट्स प्लॅन, लेखकाचे परवानगी पत्र, डी.आर.म. पत्र, कलाकारांची आणि तंत्रज्ञांची यादी देणे बंधनकारक आहे. संघात ८ पेक्षा जास्त तंत्रज्ञ असता कामा नये.
१०) संयोजकांकडून ८ लाईट स्पॉट, (लाईट्स बारचे डिझाईन संकेत स्थळावर उपलब्ध आहे.) ९” व १५” २ लेव्हल, २ मोडे, २ खुर्ची, २ टेबल स्पर्धास्थळी निशुल्क उपलब्ध करून देण्यात येतील. या व्यतिरिक्त गरजेच्या रंगभूषा/वेशभूषा इ. आणि अश्या सर्व बाबींकरिता सवलतीच्या दरात शुल्क आकारले जाईल. परंतु त्याची माहिती प्राथमिक फेरीलाच देणे बंधनकारक असेल.
११)प्राथमिक फेरीला सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय कुठल्याही संघाचा अंतिम फेरीत प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही.
१२)प्रत्येक स्पर्धक संघास एकांकिका सादर करण्यासाठी ०१ तासाचा (६० मिनिटे) कालावधी देण्यात येईल. या कालावधीतच रंगमंच मांडणी, प्रकाश योजना, ध्वनी योजना यांसह एकांकिका सादर करून प्रत्येक संघाला रंगमंच रिकामा करावयचा आहे. हा नियम अतिशय काटेकोरपणे पाळला जाणार असुन हा नियम न पाळणाऱ्या संघास स्पर्धेतून त्वरित बाद / डिबार करण्यात येईल.
१३)आपणास दिलेल्या तारखेस आणि वेळसच एकांकिका सादर करावी लागेल. आपली एकांकिका सुरु होण्याच्या २ तास आधी रिपोर्टिंग करणे गरजेचे आहे.
१४)स्पर्धेचे लॉटस १४ जानेवारी २०१९ रोजी संघाना फोनद्वारे कळविण्यात येतील, तसेच ते स्पर्धेच्या संकेत स्थळावरही जाहीर करण्यात येईल.
१५) कुठल्याही संघाने कसल्याही प्रकारचे गैरवर्तन अथवा नियमबाह्य काम केल्यास त्याचा परिणाम निकालावर होईल, तसेच तो संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
१६)लेखनाच्या पारितोषिकासाठी सर्व लेखकांचा विचार केला जाईल, परंतु अनुवादित, भाषांतरित, रुपांतरीत अथवा आधारित संहिता असल्यास तिचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. तसेच अशा एकांकिका असणाऱ्या संघांनी एकांकिका सादर करण्यापूर्वी मुळ लेखकाची/प्रकाशकाची/त्याच्या वारसाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याबाबतची कुठलीही जबाबदारी स्पर्धा संयोजकांकडे नसेल.
१७) स्पर्धेच्या वरील सर्व नियमात व कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवलेला असुन, नियमांच्या अर्थाबाबत (Interpretation) संस्थेचा निर्णय अंतिम राहील व तो संयोजकांकडे असेल.संपर्क


संपर्क

विवेक जोशी : ७२७६३५५१४८
सौरभ कुलकर्णी : ९०२८१७१४४१
हर्षल बोरा : ९२२५५१५१५१

ई-मेल

info@mahakarandak.com

पत्ता

स्वप्नील मुनोत, ८३९, शांती, बागडपट्टी, अहमदनगर -४१४००१

रंगभूमीच्या ह्या रणसंग्रामासाठी सज्ज व्हा !!